महोत्सवात खालील चित्रपट पाहायला मिळतील...
०१. अग्निदिव्य (प्रिमिअर) - चिं. त्र्यं. खानोलकर यांच्या 'अगोचर' कादंबरीवर आधारित
०२. गाभ्रीचा पाऊस
०३. घो मला असला हवा
०४. हरिश्चंद्राची फॅक्टरी
०५. टिंग्या
०६. वळू
०७. गुलमोहर
०८. मर्मबंध
०९. बेधुंद
१०. एवढेसे आभाळ
११. चेकमेट
१२. गंध
१३. कदाचित
१४. धुडगूस
१५. साडेमाडेतीन
१६. उलाढाल
१७. दे धक्का
१८. एक डाव धोबीपछाड
१९. जोगवा
२०. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय
२१. वासुदेव बळवंत फडके
२२. मेड इन चायना
२३. फॉरेनची पाटलीण
२४. जाऊ तिथे खाऊ
मराठी चित्रपट बघायचे आहेत, पण कुठले बघायचे ते कळत नाही, असं बर्याच जणांनी वेळोवेळी सांगितलं. महाराष्ट्रातच रहाणार्यांचं ठीक आहे; पण महाराष्ट्राबाहेर किंवा देशाबाहेर रहात असताना मराठी चित्रपटांबद्दल पुरेशी माहिती कळत नाही आणि बरेच उपद्व्याप करून (म्हणजे internet वरून pirated copy download करून!!) एखादा चित्रपट पैदा करावा तर तो असा भंगार निघतो की विचारता सोय नाही, असंही सुनावलं गेलं. (खरंतर महाराष्ट्रातच रहाणार्यांपर्यंतही मराठी चित्रपटांची पुरेशी माहिती पोचत नाही. पण ते जाऊदे.)
काही चांगल्या चित्रपटांबद्दल सविस्तर लिहायचा बेत बरेच दिवस तसाच भिजत पडला आहे. तो पूर्ण होईल तेव्हा होवो. पण या महोत्सवाच्या निमित्ताने कोणाला चित्रपट बघायचे असल्यास काही चांगली नावे तरी हाताशी असावीत म्हणून मी बघितलेल्या काही चित्रपटांबद्दल येथे थोडक्यात लिहीत आहे. श्रेणी आणि मतं अर्थातच माझी वैयक्तिक आहेत; त्यामुळे त्यावर मतभेद शक्य आहेत. मला आवडलेला चित्रपट एखाद्याला आवडला नाही किंवा याउलट झाले तरी माझी काही हरकत नाही. तसे झाल्यास तुमची मते खुशाल या ब्लॉगवर नोंदवा.
दर्जेदार (****) - पहाच!!
चित्रपट | दिग्दर्शक | थोडक्यात |
---|---|---|
वळू | उमेश कुलकर्णी | http://naviprabhat.blogspot.com/2008/01/valu-wild-bull.html |
वास्तुपुरूष | सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर | http://naviprabhat.blogspot.com/2008/04/blog-post.html |
हरिश्चंद्राची फॅक्टरी | परेश मोकाशी | अप्रतिम. पहाच!! |
टिंग्या | मंगेश हाडवळे | काळजाला भिडणारा अस्सल मराठी चित्रपट. बघाच! "माझे आभाळ तुला घे" हे गाणेही छान |
देवराई | सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर | सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर जोडीचा आणखी एक उत्तम चित्रपट. अतुल कुलकर्णीने कमालच केली आहे. मात्र मधेच थोडा वेळ माहितीपट बघितल्यासारखं वाटतं |
डोंबिवली फ़ास्ट | निशिकांत कामत | निशिकांत कामतचा पहिला चित्रपट (दुसरा मुंबई मेरी जान). थेट अर्धसत्यची आठवण करून देणारा. संदीप कुलकर्णी एकदम छान |
पक पक पकाक | गौतम जोगळेकर | सुंदर कथा, नाना पाटेकर आणि सर्वांवर कडी करणारा सक्षम कुलकर्णी. मुलांबरोबर बघा. |
कथा दोन गणपतरावांची | अरूण खोपकर | हा खरंतर १४-१५ वर्षांपुर्वीचा चित्रपट. पण पाहिला नसेल तर जरूर पहा. दर्जेदार कथा आणि चटका लावणारा शेवट. गाणीही धमाल. |
चांगला (***) - पहाण्यासारखा
चित्रपट | दिग्दर्शक | थोडक्यात |
---|---|---|
नितळ | सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर | सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर जोडीचा आणखी एक उत्तम चित्रपट. संवेदनशील आणि संयत. |
एक ऊनाड दिवस | विजय पाटकर | साधीशीच पण उत्तम कथा. सादरीकरणही कथेला साजेल असेच. मात्र तांत्रिक बाबतीत कमी. |
दहावी फ | सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर | मुलांबरोबरच मोठ्यांनीही बघायला हरकत नाही. गाणीही मुलांना आवडतील अशीच धमाल. |
उलाढाल | आदित्य सरपोतदार | उत्तम मराठी mainstraem चित्रपट. निखळ मनोरंजन. त्यावर अजय-अतुलचं संगीत. "मोरया मोरया" हे गाणं ऐकाच. |
श्वास | संदीप सावंत | राष्ट्रीय पुरस्कारविजेता चित्रपट. आणखी काय बोलणार!! |
लिमिटेड माणुसकी | नचिकेत - जयू पटवर्धन | हा खरंतर १४-१५ वर्षांपुर्वीचा चित्रपट. पण एक वेगळी Black comedy म्हणून बघायला हरकत नाही. |
बिनधास्त | चंद्रकांत कुलकर्णी | १० वर्षे जुना. १९९९ चा असला तरी माझ्यामते मरगळलेल्या मराठी चित्रपटाला नव्या शतकाकडे नेणारा पहिला mainstream मराठी चित्रपट. |
सावरखेड एक गाव | राजीव पाटील | चांगला mainstraem रहस्यपट. तगडी starcast. अजय-अतुल नेहेमीप्रमाणे अविस्मरणीय. "वार्यावरती गंध पसरला". |
काय द्याचं बोला | चंद्रकांत कुलकर्णी | चांगला जमून आलेला विनोदी चित्रपट. एक दोन प्रसंग तर खूपच हसवतात. |
चेकमेट | संजय जाधव | तांत्रिक दृष्ट्या चकचकीत. पण कथा जितकी अवघड आहे तेवढी परिणामकारक नाही. पण Race, Singh is King सारखे फालतु हिंदी चित्रपट पाहण्यापेक्षा केव्हाही चांगला. |
ठीक (**) - पहायला हरकत नाही
चित्रपट | दिग्दर्शक | थोडक्यात |
---|---|---|
अगं बाई अरेच्चा | केदार शिंदे | तांत्रिक बाजू चांगल्या. पण एकूण चित्रपट तसा ठीकच. अजय-अतुलचं संगीत मात्र एकदम अफलातून. बघणार नसाल तरी Audio CD आणाच. |
मी शिवाजीराजे भोसले बोलतोय | संतोष मांजरेकर | पहायला हरकत नाही. जितका गवगवा झाला तितका काही चांगला नाही. पण व्यावसायिक दृष्ट्या इतके यश मिळवणे ही देखील काही कमी गोष्ट नाही. चित्रपट तांत्रिक बाबीत हिंदी चित्रपटाइतकाच चकचकीत आहे. सचिन खेडेकर छान. |
चकवा | जतिन वागळे | बर्यापैकी चांगला रहस्यपट आणि अतुल कुलकर्णी. "अजून उजाडत नाही गं" हे गाणं अप्रतिम. ही संदीप खरे - सलील कुलकर्णीची किमया. |
अचानक | चंद्रकांत कुलकर्णी | चित्रपट थोडाफार नाटकासारखा वाटतो. पण एकंदरीत चांगला आहे. शेवटचा उलगडा फारसा परिणामकारक वाटत नाही. |
सनई चौघडे | राजीव पाटील | ठीक-ठाक. कथेत फारसा दम नाही. आणि काही प्रसंग अगदी शब्दबंबाळ. अवधुत गुप्तेचं कांदेपोहे हे शीर्षकगीत छान. |
एक डाव धोबीपछाड | सतीश राजवाडे | फार धमाल विनोदी प्रसंग नाहीत. मात्र फार पांचटही नाहीत. |
मातीच्या चुली | सुदेश मांजरेकर - अतुल काळे | चकचकीत चित्रपट. कलाकारांचा अभिनयही छान. मात्र पटकथा फारशी बांधीव आणि एकसंध नाही. |
अनाहत | अमोल पालेकर | कथेत फारसा punch नाही. मात्र दिग्दर्शन आणि संगीत उल्लेखनीय. |
सातच्या आत घरात | संजय सूरकर | काही प्रसंग अगदी शब्दबंबाळ आणि प्रचारकी. बाकी ठीक-ठाकच. |
दे धक्का | सुदेश मांजरेकर - अतुल काळे | चकचकीत चित्रपट. मात्र पटकथा अगदीच विस्कळीत. गाणी छान, मात्र त्यात A R Rahmaan च्या संगीताची उचलेगिरी फार. सिद्धार्थ जाधव धमाल. |
बोक्या सातबंडे | राज पेंडुरकर | सुट्टीत मुलांनी हट्ट धरला तर न्यायला हरकत नाही |
तद्दन भिकार (*) - पाहु नका
चित्रपट | दिग्दर्शक | थोडक्यात |
---|---|---|
माझा नवरा तुझी बायको | केदार शिंदे | खरंतर एकदम बिनडोक comedy. पण समोर लागलाच तर सिद्धार्थ जाधवला बघा. |
आईशप्पथ | संजय सूरकर | ठाव न घेणारी फसलेली कथा. मानसी साळवी दिसलीय छान. अंकुश चौधरी आणि श्रेयस तळपदे उत्तम. अशोक पत्कींचं "दिस चार झाले, मन पाखरु होऊन" हे गाणं सरस. |
सखी | संजय सूरकर | चांगल्या विषयाचं वाट्टोळं. आणि त्यामुळे अशोक सराफ, सोनाली कुलकर्णी सारखे ताकदीचे कलाकार उगाचच वाया गेलेत. |
जत्रा | केदार शिंदे | बिनडोक comedy. डोकं बाजूला ठेवूनही पुर्ण बघवला नाही. अजय-अतुल मात्र पुन्हा अफलातून. "कोंबडी पळाली" आणि "ये गो ये मैना". |
तुला शिकविन चांगलाच धडा | गिरीश मोहिते | जुन्या "चुपके चुपके" ची भिकार नक्कल. "डिपाडी डिपांग" मात्र सरस. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे, तुमची बहुमोल गाणी असल्या चित्रपटांवर वाया घालवू नका. |
सैल | गजेंद्र अहिरे | गंभीर चित्रपट असला म्हणुन काही लगेच चांगला चित्रपट होत नाही. |
दोघात तिसरा आता सगळं विसरा | कांचन अधिकारी | बिनडोक comedy. अजिबात बघु नका |
जाऊ तिथे खाऊ | अभय किर्ती | मोठा सामाजिक विनोद केल्याचा आव आणणारा प्रत्यक्षात अत्यंत फालतु चित्रपट. अजिबात बघु नका |
चश्मेबहाद्दर | विजय पाटकर | बिनडोक comedy. अजिबात बघु नका. एक उनाड दिवस सारखा चांगला चित्रपट याच दिग्दर्शकाने बनवला असेल यावर विश्वासच बसत नाही. |
नवरा माझा नवसाचा | सचिन पिळगावकर | Hit झाला असला म्हणून काय झालं? सचिनचा असला तरी अशीही बनवाबनवी वगैरेची सर नाही. डोकं बाजूला ठेवून बघा. |
5 comments:
Dhanyawad. Aata me jeva parat Punyala yein teva kuthya DVD ghyaychya te tharavata yeil. Me je kahi chitrpat baghitale aahet tyavarun apyla aawady sarkyach watatat.
Sunil
३६ मराठी सिनेमे पाहून त्याबद्दल मत प्रदर्शित केल्याबद्दल धन्यवाद !
"दर्जेदार" आणि "चांगले" या दोन्ही गटातील बहुतेक सिनेमे आम्ही पाहिलेले आहेत.
"अजिबात पाहू नका" मधला फक्त एक पाहिलेला आहे.
खूप गवगवा झाल्याशिवाय आम्ही सिनेमा पाहात नाही असं दिसतंय. सिनेमा पाहण्यासाठी आम्ही परीक्षणावर अवलंबून असतो किंवा दिग्दर्शक चांगला आहे का हे बघतो.
यादीसाठी सहज आठवणारे सिनेमे :
कैरी, बनगरवाडी, दोघी, निवडुंग, रेस्टॉरंट, एक होता विदूषक, भेट, घो मला असला हवा, मातीमाय, सावली.
jhakaas!!!!
pan mala asa vatate ki 'aga bai areccha' ani 'matichya chuli' la jara varchi category chalali asati...
आज महोत्सवात "हरिश्चंद्राची फॅक्टरी" पाहिला. अप्रतिम. संधी मिळाली तर सोडू नका.
"गाभ्रीचा पाऊस" मात्र चुकला. पण तो जून मद्धे नीट release होतो आहे. तेव्हा पहायला मिळेल. सर्वांनी जरूर पहा.
the list good i agree with most of the categories...
-Jayawant
Post a Comment